Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...विरोधकांचा विकासकांशी संबंध आहे का? - चित्रा वाघ

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
जामखेड - पालकमंत्री राम शिंदे विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. विरोधकांचा विकासकांशी संबंध आहे का? या मतदारसंघात त्यांनी काय विकासकामे केली? लंकेतील सोन्याच्या वीटा तुमच्या कामाच्या नाहीत, आपल्याला 'राम'राज्यच हवे, अशा शब्दात प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा.राम शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ नान्नज येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आशा राम शिंदे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा कविता जगदाळे, सरपंच डॉ. विद्या मोहोळकर, जिप सदस्या वंदना लोखंडे, पं.स. सदस्या मनिषा सुरवसे, नगरसेविका अर्चना राळेभात, वैशाली झेंडे, सुरेखा राळेभात, सुमन शेळके आदींसह महिला उपस्थित होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, सुख, दु:ख आपल्याच माणसाला कळते. मी २० वर्षे तिथेच होते. त्यामुळे तेथील सगळी माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही भूलथापांना बळी पडू नका. राम शिंदे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची उतराई म्हणून त्यांच्या पाठिशी रहा, असे आवाहनही त्यांनी केले.
आशा शिंदे यांनीही विरोधकांवर निशाणा साधला. घराणेशाही विरूध्द लोकशाही अशी ही निवडणूक आहे. विरोधकांना भेटायला पास घ्यावे लागतात. पालकमंत्र्यांना भेटून हक्काने तुम्ही समस्या मांडू शकता, असे त्या म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments