Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर-कल्याण रोडवरील खड्डा बनला मृत्यूचा सापळा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : नगर- कल्याण महामार्गावर शिवाजीनगर परिसरात पेट्रोलपंपाजवळ रस्त्याची मोठी दुरावस्था होऊन मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावरून जाणार्‍या वाहनांना या खडड्यातून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, या खड्ड्यामध्ये पाऊसाचे पाणी साचल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. हा महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरत असणारा खड्डा तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने  बुजविण्यात यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.  
कल्याणरोड हा मार्ग असल्याने या रस्त्याने नेहमीच वर्दळ आहे. वास्तविक पाहाता या झालेल्या खड्ड्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक महामार्ग रस्त्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असते. पण याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोयीकर दुर्लक्ष करीत आहेत. या खड्ड्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा खड्डयात पाणी साचले जाते. रात्रीच्या वेळी या खड्ड्याचा अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांना अंदाज न आल्याने येथे अपघाताची मालकीचा सुरु झाली आहे. हा अपघातास अंमत्रण देणारा खड्डा लवकारात लवकर बुजवावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. तातडीने हा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाने न बुजविल्यास मोठा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी दिला आहे. 

Post a Comment

0 Comments