Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीत पंकजा मुंडे घडयाळ दाखवितानाची छबी चर्चित

 

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - ऐन निवडणुकीत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या हाताच्या घडयाळकडे इशार करतानाची छबीची चर्चा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात चांगलीच चर्चिली जात आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत विरोध असतानाही भाजपाकडून आमदार मोनिका राजळे यांनाच उमेदवारी दिली. यानंतर भाजपाचेच राजळे यांना विरोध करणारे एकदमच शांत झाले. या निवडणुकीत काही दिवसापासून सगळ्याच सोशल मीडियावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हातातील घडयाळ दाखवित असल्याची छबी फिरत आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यात आता एकमेकांना कामाला लागा, असे म्हणतात व मुंडे यांची छबी दाखवत कार्यकर्ते गावागावात फिरताना दिसत आहे. या वातावरणामुळे भाजपच्या कार्यकर्ते एकमेकांना जरा सबुरीने घ्या, असे म्हणत आहेत. आमच ठरलय, जणू असा तर संदेश देत नाही ना ? अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे.

Post a Comment

0 Comments