Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव परिसरात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान


आँनलाईन न्यूज नेटवर्क / व्हिडीओ
नगर रिपोर्टर
शेवगाव - तालुक्यातील ढोरजळगांव व परिसरात प्रारंभी पाऊसाची अवकृपा झाली, परंतु परतीच्या पाऊसाने हातात आलेली बाजारी, कापूस या महत्त्वाच्या पिकांची चांगलीच वाट लावली आहे. यावर्षी शेवटी चांगला पाऊस झाला खरा पण, या धुव्वाधार पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेल्या ज्वारीला हिरवे कोंब करे फुटलेले आहे. मक्यचीदेखील तिच परिस्थिती आहे. कपाशीच्या झाडावर फुललेल्या कापसालादेखील कोंब फुटलेले आहेत. खरीप हंगामातील उडीद, मूग, बाजरी अगोदरच पाण्यात भिजली.
आता उर्वरित हंगामही या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने हिरावला आहे.ओल्या दुष्काळाची स्थिती सध्या परिसरात निर्माण झाली आहे.
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे नद्या पुरस्कार आले असुन बंधारे शेततळे तसेच नाल्यांना पूर सुरु असुन ओसंडुन वाहत आहेत. शेतांमध्ये चोहीकडे पाणीच पाणी साचलेले दिसत आहे वेचणीला आलेला कापूस या पावसात भिजल्यामुळे कपाशी पिकाला कोंब फुटु लागल्याने हातचे गेले आहे उभरत्या बाजरी मका पिकांना कोंब करे फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी - मिनाताई पाटेकर
झाडावरच कापसाला कोंब फुटलेले आहे. तसेच काढणी झालेल्या मका व ज्वारीला देखील कोंब फुटलेले आहेत. शेतकऱ्याच्या घरात खरीप हंगाम १० टक्के सुद्धा येण्याची शक्यता नाही. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारपावसाने प्रचंड शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे.तसेच रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार आहे.
खरीप हंगामात प्रचंड आर्थिक फटका शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.तरी त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मीनाताई पाटेकर यांनी शासनाकडे केली आहे.

रामनाथ खोसे प्रगतीशील शेतकरी ---
शेतकऱ्यांच्या कष्टाने आलेले खरीप पिके पुर्णपणे नष्ट झाले बियाणे खते मजुरी पूर्णपणे वाया गेली. दिवाळीपूर्वी केलेली ज्वारी हरभरा पेरणी अतिपावसाने वाया गेली शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे त्यातच दिवाळी तोंडावर आली असताना कोणत्याही माल विक्रीस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Post a Comment

0 Comments