Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी ते खरवंडी विशाखापट्टणम महामार्गावर खड्डेच खडे ; निकष्ट असल्याचा नमुना उघड


आँनलाईन न्यूज नेटवर्क / व्हिडीओ
नगर रिपोर्टर
अहमदनगर - लोकसभा व विधानसभा होण्यापूर्वी काही महिने अगोदर तिसगाव ते पाथर्डी (खरवंडी) या विशाखापट्टणम महामार्गाचे कोट्यवधी रुपये खर्चून भाजप-शिवसेना युतीच्या कालावधीत काम करण्यात आले. पंरतु हा विशाखापट्टणम महामार्ग पहिल्याच पावसाने उखडून गेला असून महामार्गावर खड्डेच खडे झाले आहेत. यामुळे हे झालेले काम किती निकष्ट झाले आहे, प्रत्यक्षात वरुण राजाने उघड केले आहे.
पहिल्याच पावसाने विशाखापट्टणम (पाथर्डी ते खरवंडी) महामार्गावर शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून केले डांबरी काम किती निकष्ट आहे. याचा नमुना महामार्गावर झालेल्या कामापासून पहिल्याच पावसाने दाखवून दिले आहे. वास्तविक या रस्त्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराकडून या महामार्गावर झालेल्या खर्च हा व्याजासहीत वसुल केला पाहिजे, अशी मागणी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे. विशाखापट्टणम पाथर्डी-खरवंडी या महामार्गावर मधोमध मोठमोठी खड्डे झाली आहेत. ही खडी हुकविताना दुचाकीस्वारांना व मोठ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या दयनीय परिस्थितीमुळे विशाखापट्टणम महामार्गावर छोटे मोठ्या अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून उर्वरित राहिलेल्या विशाखापट्टणम महामार्गाचे काम करावेत, अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments