Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खासदार साहेब नगरच्या उड्डाणपूलचा बघा !


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - आता लोकसभा व विधानसभा झाली, सगळ्या महत्त्वाचे जिल्ह्यात दुसरे कोणी मंत्री पदाचे दावेदार ही उरले नाहीत, मग आता बोलल्याप्रमाणे खासदार डॉ सुजय विखे पाटील अहमदनगरचा उड्डाणपूल मार्गी लावा, अशी मागणी अहमदनगर शहरातील नागरिकांनी सुरु केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी उड्डाणपूलचा एक तरी पिलार उभा करू, असे आश्वासन खुद्द नगरकरांसमोर खासदार विखे यांनी दिले होते. परंतु हे आश्वासनाची पूर्तता झाली नाही. यामुळे यापूर्वीही दक्षिणेतील विकास कामे करु, असे आश्वासन देत विखे घरण्यांनी निवडणूक जिकंल्या पण त्यानंतर पाण्याचा प्रश्न असो अथवा अन्य समस्या सोडवण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याच्या उदाहरणे देत नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. या घटना यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे खासदार डॉ विखे अहमदनगरच्या उड्डाणपूलचे आश्वासन खरंच पूर्ण करतात की, नगरकरांना कात्रजचा घाट दाखवतात. हे लवकरच समोर येईल, तसे झाल्यास आजोबाच्या पावलावर पाऊल नातवाने ठेवल्यास विखे घरण्यांच्या शब्दावरुन दक्षिणेतील प्रत्येक नागरिकांचा विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. ही सर्व परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खासदार डॉ विखे यांनी म्हटल्याप्रमाणे अहमदनगर उड्डाणपूल मार्गी लावावा लागेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments