Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसेनेचा उपमुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ खात्यांवर डोळा


युतीत सरकारची 1995 च्या फॉर्मुल्यानुसार सत्तेचे वाटप...
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई ः भाजपला सत्तास्थापनेसाठी मदत करताना शिवसेनेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. 2014 मध्ये भाजपने शिवसेेनेला नेहमीच दुय्यम वागणूक दिली आहे, ही खंत आहे. शिवसेनेने आता लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करून दिली आहे. राजकीय वर्तृळातील चर्चा 1995 मध्ये राज्यात युती सरकार असताना भाजपला तेव्हा जी महत्त्वाची खाती दिली होती, तिच खाती आता शिवसेनेला हवी आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 चा फॉर्म्युल्यावर भाष्य करणे अनेकदा टाळले होते. मात्र, गुरुवारी निकाल जाहीर होताच पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरेंनी भाजपला लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या 50-50चा फॉर्म्युल्या केल्याची आठवण करून दिली.  राज्यात आता त्यानुसारच सत्तेचे वाटप केले जाईल, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत विधानसभेला 1995 च्या सूत्रानुसार सत्तावाटप होईल, असे ठरल्याचे सांगितले जाते. तो शब्द आता भाजपने पाळावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेतून होत आहे. 1995 च्या निवडणुकीत शिवसेनेने 73 तर भाजपने 65 जागा जिंकल्या होत्या. मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर भाजपला उपमुख्यमंत्रिपद दोन्ही पक्षांचे 14 - 14 कॅबिनेट मंत्री होते.  भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, मयुती करताना जे ठरले आहे त्यानुसारच सत्तेचे वाटप होईल. उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला यापूर्वीही देण्यास आम्ही तयार होतो, परंतु त्यांनी घेतले नाही. आता जर युतीच्या फॉर्मुल्यात तसे ठरले असेल तर त्यांना उपमुख्यमंत्रिपदही दिले जाईल.

Post a Comment

0 Comments