Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पारनेर पोलिसांची दारुड्याच्या फोनने धावपळ

माहिती खोटी निघाल्याने दारुड्याविरुद्धात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः पोलिस नियंत्रण कक्षेला भाळवणी गावाच्या शिवारात वाळूची वाहने आलेली आहे. या वाळूच्या वाहनांवर कारवाई करा, अशी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी गेले असता, कोणतीही घटनासमोर न  आल्याने नियंत्रण कक्षेला खोटी माहिती देणार्‍या त्या दारुड्याविरुद्धात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील माळवाडी,ढवळपुरी (ता.पारनेर) येथील आकाश बबन चौधरी याने दारुच्या नशेमध्ये मो.7796039797 या भ्रमणध्वनीवरून अहमदनगर पोलिस नियंत्रण कक्षेला भाळवणी येथे वाळूची वाहने आलेली आहेत. या वाळूच्या वाहनांवर कारवाई करा, अशी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पारनेर पोलिसांनी घटनास्थळी गेले असता, त्या ठिकाणी कोणतीही वाहने आढळून आली नाही. मिळालेली माहिती खोटी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने, भ्रमणध्वनीवरून माहिती सांगणार्‍या आकाश चौधरी याच्याविरुद्ध खोटी माहिती देऊन शासकीय पोलिस यंत्रणेचा कामाचा अपव्यय केलेला आहे, अशी फिर्याद पारनेर पोलिस ठाण्याचे पो. कॉ. सचिन राजेंद्र लोळगे यांनी दाखल केली आहे. चौधरीविरुद्धात पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून त्याच्यावर गु.र.नं.864/19 भा.द.वि.कलम182 सह महाराष्ट्र पोलिस कायदा क 85(1)प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments