Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी रेल्वे पोलीसांनी साईभक्तांना लुटणाऱ्या चोरट्यांना पकडले


आँनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर
शिर्डी - येथील रेल्वे स्टेशनवर साईभक्तांना लुटणाऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलीसांनी पकडले. दत्तात्रय अशोक बोर्डे (वय २४ रा.रामपूरवाडी ता.राहाता, जि.अ.नगर), तनवीर सुतार शेख (वय २२ रा.पुणतांबा ता.राहाता जि.अ.नगर) अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत शिर्डी रेल्वे पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,
साईनगर-शिर्डी ही रेल्वे गाडीत पकडण्यासाठी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी धमकावून ५०० रुपये लुटून नेले, अशी फिर्याद शंकर गोविंदराव बापरानी (रा.नोंदड) यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात दिली. त्या अनुषंगाने ठाण्याचे निरीक्षक आर एल मिना यांच्या मार्गदर्शनाखाली सउपो पी एन सातपुते, प्र आ. एस के दिक्षित, आरक्षक निलेश बी पाटील यांनी घटनास्थळी जाऊन रेल्वे स्थानक बाहेर थांबलेले दत्तात्रय अशोक बोर्डे (वय २४ रा.रामपूरवाडी ता.राहाता, जि.अ.नगर), तनवीर सुतार शेख (वय २२ रा.पुणतांबा ता.राहाता जि.अ.नगर) या दोघांना पकडून आणले. त्याच्याकडील लुटीतील ५०० रुपये व बजाज पल्सर गाडी ताब्यात घेतली. दोन्ही आरोपी विरुध्दात शिर्डी पोलीस ठाण्यात ९६०/२०१९ कलम ३९२, ३४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि. बी. झेड जाने करीत आहेत.
साईभक्तांनी यात्रेदरम्यान सावधान राहा. कोणत्याही अनओळखी व्यक्तीकडून खाण्याची अथवा पिण्याची वस्तू घेऊ नये. काही तक्रार असल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाईन १८२ या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन शिर्डी रेल्वे स्टेशनचे निरीक्षक आर एल मिना यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments