Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात पाणीच पाणी


नवीन राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगरचे कार्यालय होणे अपेक्षित - अधीक्षक नवलकर
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दोन दिवस सुरु असलेल्या धो-धो पावसामुळे पाणी घुसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.
उत्पादन शुल्क कार्यालयात पाणी घुसल्याने कर्मचाऱ्यांना कागदपत्रे व अन्य वस्तू उचलण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अधीक्षक व निरीक्षक ही दोन्ही कार्यालय ब्रिटिश कालीन आहेत. रस्त्यापासून खालगट भागात  कार्यालय असल्याने   रस्त्यावरील पाणी पावसाळ्यात या दोन्ही कार्यालयात जाते. ही दोन्ही नवीन कार्यालय व्हावे, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवला असून त्याचा पाठपुरावा चालू आहे. अहमदनगरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन्ही ही कार्यालये तातडीने उभे राहावेत, अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments