Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहराची इमेज बिल्टअप करणारे व्हिजन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेने साथ द्यावी - आ जगताप


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगरराष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मागील 5 वर्षात नगर शहरात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडून पुढील पाच वर्षाचे विकासाचे ‘व्हिजन 2024’ नगरकरांसमोर जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडले आहे. शहराची इमेज बिल्टअप करणारे व्हिजन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेने साथ द्यावी, अशी सादर आ.जगताप यांनी नगरकरांना घातली आहे.
माऊली सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी जाहीरनामा सादर केला आहे. आ.संग्राम जगताप म्हणाले की, नगरच्या जनतेने मला मतदान करुन माझ्यावर विश्वास टाकून आमदारकीची जबाबदारी दिली होती. या विश्वासास पात्र राहत नागरिकांना दिलेल्या वचनांची, आश्वासनांची पूर्ती करत विकास कामे करता आली. विरोधी पक्षाचा आमदार असतांनाही सातत्याने शासन दरबारी पाठपुरवठा करुन विविध योजनांच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. या निधीतून बरीचशी विकासकामे मार्गी लागली असून, काही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पाच वर्षात प्रत्यक्ष विकास कामांची उभारणी करणार आहे. विकास कामांसाठी माझी जिद्द व चिकाटी आहे. ‘व्हिजन 2024’ सर्व नागरिकांपुढे मांडले आहे. या माध्यमातून शहराची इमेज बिल्टअप होणार आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments