Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शस्त्र तस्करी करणाऱ्या दोघांना ५ देशी बनावटी पिस्टल, १५ जिवंत काडतूसे, इंटीगा कारसह अटक


स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सांगली - आटपाडी येथे शस्त्र तस्करी करणाऱ्या दोघांना ५ देशी बनावटी पिस्टल, १५ जिवंत काडतूसे, इंटीगा कारसह अटक केली आहे. देवा उर्फ देवेंद्र तानाजी सांगवे (वय २४, थेरगाव, चिंचवड, पुणे), बाला उर्फ बालाजी गणपत अदाटे (वय २२, बालटेनगर, दिघंचारोड आटपाडी जि.सांगली) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, आटपाडी (सांगली) विभागात पेट्रोलींग करीत जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी यासारखी गुन्हे करणारे आरोपी यांना चेक करत व गुन्हे उघड करण्याच्या दष्टीने व फरार आरोपीचा शोध घेत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असताना पोलिसांना देवा सांगवे व बाल अदाटे ही दोघे गावठी बनावटीचे पिस्टल देण्यासाठी सिल्व्हर ईरटीगा गाडी (एमएच १४, एफसी ००६९) या गाडीतून आटपाडी शहरातून नाझरे रोडने सांगलीकडे जाणार आहेत, मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार
ईरटीगा गाडी दिसताच, संशय आल्याने दोघांना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील टुरिस्ट ईरटीगा गाडीची झडती घेतली असता, चालक सिटखाली सँकमध्ये ५ गावठी पिस्टल व १५ जिवंत काडतूसे, ५ मँग्झिन आणि ईरटीगा गाडी असा ९ लाख ५४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दोघाविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात आरोपींना देण्यात आले.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.श्रीकांत पिंगळे, पोउनि प्रविण शिंदे, पोहेकाँ बिरोबा नराळे, संतोष गळवे, निलेश कदम, सागर लवटे, संदिप गुरव, अनिल कोळेकर, संदीप पाटील, विशाल भिसे, गौतम कांबळे, संदीप नलावडे, सचिन कोळी, जितेंद्र जाधव, महादेव नागणे, किसन काबुगडे, निसार मुलाणी आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments