आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - पक्ष नेत्यांच्या आदेशान्वये महापौर झालेल्या अभिषेक कळमकर यांनी आरोप करताना स्वतःची राजकीय उंची तपासावी. जगताप पिता-पुत्रांनी आपल्याला महापौर करण्यासाठी स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांची व नेत्यांची नाराजी तुमच्यासाठी ओढवून घेतली होती, याची तरी जाण ठेवायला हवी होती. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने तर केलेच नाही. पण महानगरपालिकेत टक्केवारी वसूल करण्यातच कारकिर्दी वाया घातली, असा घाणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश चिपाडे यांनी केला आहे.
0 Comments