Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जातीपातीच्या राजकारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं जहाज बुडत आहे ः पंकजा मुंडे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर -  जातीपातीच्या राजकारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं जहाज बुडत आहे आणि 15 वर्षांतील गलथान कारभारामुळे लोकांनी त्यांना नाकारले आहे, अशी टीका करतानाच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तुमचे एक एक मत पक्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी उपयोगी पडणार आहे, असल्याचे प्रतिपादन भाजपाचे नेत्या पंकजाताई मुंडे यांनी केले.
पाथर्डीतील श्रीतिलोक जैन विद्यालयाच्या मैदानावर भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुंडे बोलत होत्या. खासदार डॉ. सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, अर्जुन शिरसाठ, अमोल गर्जे, बाबासाहेब ढाकणे, भीमराव फुंदे या वेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, बीड व नगर जिल्हा शेजारी आहे. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार विखे यांच्यात आपल्या जिल्ह्यातून अधिकाधिक आमदार निवडून देण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे काळजी करू नका, असे सांगत शेजारी उभ्या असलेल्या मोनिका यांच्या पाठीवर थाप मारून त्यांनी आश्वासित केले. मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार व मतदारसंघातील इतर नेत्यांची नावे भाषणात घेतली नाही, त्यांच्यावर टीका केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावही न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळी चर्चा सुरू झाली.
परळी माझी आई, तर पाथर्डी माझी मावशी आहे, या गोपीनाथ मुंडे यांच्या घोषणेचा पुनरुच्चार करत पंकजा म्हणाल्या, आईची माया कमी पडेल एवढी माझ्यावर मावशीची माया आहे. एकेकाळी वाजपेयी-मुंडे समीकरण होते, आता मोदी-मुंडे असे समीकरण जुळले आहे. परळीबरोबर पाथर्डीलासुद्धा भरभरून निधी दिला. जाती-पातीचे राजकारण आम्ही कधीच केले नाही अन् करत नाही. प्रास्ताविक आमदार राजळे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष केकाण यांनी केले. आभार माणिक खेडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments