Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नेते प्रचारात व्यस्त तर नागरिक पाण्यावाचून त्रस्तऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
पाथर्डी ः प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातील तिसगाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना ऐन ऑक्टोबर महिन्यात पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थ पाणी टंचाईच्या झळा सहन करीत असले तरी  सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी मात्र निवडणुकीच्या प्रचारात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तिसगाव- मिरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेकडून तिसगावला दीड दोन महिने पाणी मिळत नसल्याने गावाला तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 500 लिटर पाण्यासाठी 200 रुपये मोजावे लागतआहेत. विकतचे पाणी घेण्यासाठी सुध्दा टँकर चालकांकडे नंबर लावावे लागत आहेत. पाथर्डी हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वत्र ओळखला जातो. तालुक्यात डोंगर रांगा असून पाऊस पडला तरच पिके येतात अशी परिस्थिती आहे. दरवर्षी तालुक्यातील विविध गावात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात टँकर सुरु असतात. यंदाही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. आधीच दुष्काळ त्यात रोजगार नसल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाल्याचे जाणवत आहे. गोरगरीब जनता रोजगाराच्या शोध घेण्याऐवजी पाण्याच्या शोधासाठी रानोमाळ भटकत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना भर उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील विहिरींची पाणी पातळी अत्यंत खोल गेली असून अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. विहिरीला पाणी नाही तर बोअरला कुठून येणार? हातपंपाला येणारे थोडेसे पाणी मिळविण्यासाठी दिवसभर नंबर लावावा लागत आहे. गावच्या स्थानिक नळ पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडल्याने गावचा पाणी पुरवठा पूर्णपणे तिसगाव- मिरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. योजनेचे पाणी मिळाले, तरच गावात पाणीपुरवठा होतो.

Post a Comment

0 Comments