Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहरातील आजी-माजी आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली : छिंदमऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जोपर्यंत माझी उमेदवारी निश्चित नव्हती, त्यावेळी आजी व माजी आमदारांना त्यांचा विजय निश्चित वाटत होता. ज्यावेळी मला बसपची उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी या दोघांच्याही पायाखालची वाळू सरकली. या निवडणुकीत माजी आमदार अनिल राठोड यांच्या सांगण्यावरून पुन्हा हल्ला होऊ शकतो. आमदार संग्राम जगताप यांच्याकडूनही माझ्या जीवितास धोका असल्याचे बसपचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी मंगळवारी सांगितले.
दिल्लीगेट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत छिंदम बोलत होते. या वेळी बसपचे पदाधिकारी ब्रहद्रत सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष उमा शंकर यादव, संजय डहाणे, राजू शिंदे आदी उपस्थित होते.
छिंदम म्हणाले, जीविताला धोका असल्याने मी अंगरक्षकाची मागणी केली. त्यानुसार अंगरक्षकही उपलब्ध झाला आहे. माझ्याकडे पदाधिकारी कमी असले, तरी जनतेचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. आम्ही सहा ते सात दिवसांपासून फिरत आहोत. १९ ऑक्टोबरला मायावतींचीही सभा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
चार नगरसेवक सक्रिय
महापालिकेत बसपचे चार नगरसेवक आहेत. त्यांची भेट झाली असून ते आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. ते पक्षाबरोबरच असून ते काम करत आहेत. त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा झालेली नाही, असे श्रीपाद छिंदम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments