Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यातील दोघे १ वर्षासाठी स्थानबद्ध ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - जिल्ह्यातील नगर व राहाता येथील कुख्यात दोघांना १ वर्षा करिता स्थानबद्ध करण्याची कारवाई केली आहे. सुरज सुभाष जाधव (वय३२ रा.घर नं ७७९/८० ठाकुरवाडा, तोफखाना, अहमदनगर, सध्या रा.वैष्णवीनगर, केडगाव, अहमदनगर), विकी उर्फ मुन्ना महेश शिंदे (वय २२, रा.निघोज-निमगाव ता.राहाता) कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधु यांनी जिल्ह्यातील संघटीत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई करण्याचे दिलेल्या संकेतनुसार अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी पथकाने गुन्हेगार जाधव व शिंदे यांना १ वर्षाकरिता नाशिक मध्यवर्ती कारागृहात येथे स्थानबद्ध (अटक) केले आहे.

Post a Comment

0 Comments