Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ही निवडणूक सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची : आशा शिंदे

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
जामखेड-कर्जत - ही निवडणूक आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई अाहे. बाहेरचे अतिक्रमण परतावून लावण्याची जबाबदारी तुमची आहे, असे भाजपचे उमेदवार मंत्री राम शिंदे यांच्या पत्नी माजी पं. स. सभापती आशा शिंदे यांनी सांगितले. खर्डा येथील चौकसभेत त्या बोलत होत्या.
आतापर्यंत मंत्री राम शिंदे यांनी कोणतेच गट-तट न ठेवता विकासकामे केली आहेत. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात राम शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. गेल्या पाच वर्षांत कधी नव्हे एवढा मोठा निधी आणून मागील ७० वर्षांचा अनुशेष भरून काढत विकास केला, तो फक्त तुमच्या आशीर्वादाने. आताही तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. कोणाच्याही खोट्या भूलथापांना बळी पडू नका. तालुक्यातील काही शकुनीमामांनी आपले खिसे भरण्यासाठीच बाहेरून आयात उमेदवार आणला अाहे, अशी टीका आशा शिंदे यांनी केली.
या वेळी पंचायत समितीच्या सदस्य मनीषा सुरवसे, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती शारदा भोरे, नान्नजच्या सरपंच विद्या मोहळकर, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता जगदाळे, मनीषा मोहळकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना खर्डा येथील विविध समाजांच्या वतीने महिलांसह तरुणांनी जाहीर पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments