Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पराभव लक्षात आल्यानेच पुन्हा भावनिकतेचा मुद्दा समोर आणला ः प्रभावती ढाकणे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
पाथर्डी ः निवडणुकीत नाटकं करायची, नंतर कोण कोणत्या जातीचा त्यानुसार कामे करायची. साडेचार वर्षे जातीयवाद पोसायचा आणि पुन्हा आमच्या कुटुंबावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप करायचा, ही राजळे घराण्याची जुनी सवय आहे. संकटात सापडल्यावर आमची मदत चालते, वेळ निघून गेली की, आरोप करत बसायचे. आता जनतेने त्यांचे हे बेगडी राजकारण ओळखले असून पराभव लक्षात आल्यानेच पुन्हा भावनिकतेचा मुद्दा समोर आणला जात आहे, अशी टीका जि. प. सदस्य प्रभावती प्रताप ढाकणे यांनी केली.
मोहटे, पिंपळगाव टप्पा, मानेवाडी, चिंचपूर पांगूळ, वडगाव, ढाकणवाडी, जोगेवाडी, भिलवडे, करोडी, कारेगाव आदी गावांतील प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या वेळी आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, माजी जि. प. सदस्य उज्ज्वला शिरसाट, माजी पं. स. सदस्य सुमन खेडकर, माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले, आदिनाथ बडे, राजेंद्र खेडकर, आरती निर्‍हाळी, रामकृष्ण शिरसाट आदी उपस्थित होते.
ढाकणे म्हणाल्या, माझ्या पतीने संघर्षाचा वारसा जनहितासाठी जोपासला. सत्तापदे मिळूनही आमच्या कुटुंबाने जनतेशी नाळ तुटू दिली नाही. ही निवडणूक खर्‍या विरुद्ध खोट्याची आहे. आम्ही खरेपणाने राजकारण करतो. बबनराव ढाकणे यांच्या काळात बेलपारा, मोहरी, कुत्तरवाडी, पटेलवाडा, घाटशीळ पारगाव हे प्रकल्प झाले. या दुर्गम भागाला त्यांच्यामुळे न्याय मिळाला. दिवंगत माजी आमदार दगडू पाटील बडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मला मुलगी म्हणून पाठिंबा दिला. आता त्यांच्या वारसदारांनी प्रताप यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments