Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसेनेची ताकद सर्वसामान्य जनता – अंबादास पंधाडे.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर – नगरमध्ये  ७५ टक्के मतदान या धनुष्यबाणाला जनता करणार. कारण तुमचा आमचा श्वास भगवा, तुमचा आमचा ध्यास भगवा या मराठी मातीचा इतिहास भगवा आहे. शिवाजी महाराजांची ताकद हि सवर्सामान्य मावळे होते आणि शिवसेनेची ताकद सर्वसामान्य जनता आहे. असे प्रतिपादन अंबादास पंधाडे यांनी केले.
 महायुतीचे उमेदवार शिवसेनेची अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ प्रभाग दहा व अकरा मध्ये नागरिकांशी संवाद साधून त्यांचे जनआशीर्वाद घेण्यासाठी प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी अंबादास पंधाडे, लंकेश हरबा, विजय वर्मा, सतीष मैड, समीर बोरा, जसपाल पंजाबी, भाऊसाहेब उनवणे, सुभाष आनेचा,मुन्ना भिंगारदिवे, शाम सोनवणे, किरण शेटे, समीर दळवी, बंटी डापसे,अनिल गटांनी, प्रसाद भोसले, रेखा हरबा,ज्योती गोयल, नीता पवार, अमित लद्दा, वैभव जंबूरे, घनशाम हिरणवाळे, दिपक आगरवाल, अरुणा गोयल, चंद्रकांत मिरांडे, रवी चव्हाण, विशाल वालकर, महावीर कांकरिया, राजेंद्र माळू, राजू परीक सह महायुतीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी लंकेश हरबा म्हणाले प्रभाग दहा व आकरा मध्ये अनिल राठोड यांना मोठ्या मताधिक्याने मतदान घडून आण्यासाठी आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या अनिल राठोड यांना मानणारे सोबत घेवून अहोरात्र काम करत आहोत.

Post a Comment

0 Comments