Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर एलसीबीची मोठी कारवाई

1 कोटी 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त 
 जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व चोरीविरुद्ध धडक मोहिम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः जिल्ह्यामध्ये नेवासा, पारनेर व बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा व चोरी करणार्‍या व्यक्तीविरुद्ध कारवाई दोन जेसीबी, 1 टॅक्टर, 2 ट्रक, डंपर अशी एकूण 5 वाहने जप्ते करून पाच आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 1 कोटी 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नेवासा पोलिस ठाणे हद्दीत गोरख नामदेव धनवडे (वय 29, रा.गंगापूर ता.नेवासा), रविंद्र रमेश जाधव (वय 28, रा. चिंचवण,ता.नेवासा) यांच्यावर गुन्हे दाखल केले. विना नंबरचे 1 जेसीबी व एक डंपर (एमएच 20, सीटी 4708) असा 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल, पारनेर पोलिस ठाणे हद्दीत मारुती सोनाजी तोडकर (वय20, रा. देवठाणा ता.पुसत जि. येवतमाळ), अज्ञात टॅक्टर मालक आणि बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत आरोपी अज्ञात एक एल पी ट्रक (एमएच 12 एफ झेड 6483) व त्यामध्ये 4 ब्रास शासकीय वाळू 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, असा एकूण 1 कोटी 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल तीन ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, दत्ता गव्हाणे, पोना रविंद्र कर्डिले, सचिन आडबल, पोकॉ. प्रकाश वाघ, रणजित जाधव, राहीत मिसाळ, मच्छिंद्र बर्डे, शिवाजी ढाकणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
--------
रस्तालुटीतील आरोपी मुद्देमालासह अटक 
अहमदनगर ः रस्तालुटीप्रकरणातील आरोपीस मुद्देमालासह नगर शहरातील टिळकरोड येथे जाऊन पकडण्यात आले. उफरान ईलीयास शेख (वय22 रा. टिळकरोड,नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार टिळकरोड येथे एलसीबी पथकाने शोध घेऊन उफरान ईलीयास शेख यास ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्ह्यातील 10 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हस्तगत केला. शेख याच्याकडून पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने सदर मोबाईल हा मेहेर राजेंद्र कांबळे (रा.अरणगाव ता.नगर) याचेकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यावरून मेहेर कांबळे (वय21) यास मुद्देमालासह कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.
----------------
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक 
श्रीरामपूर ः येथे बिफ मार्केट वार्ड नं.2 श्रीरामपूर येथे मोबाईल चोरणारी गुन्ह्यातील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (रा.वार्ड नं.2, श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून 6 हजार रुपये किंमतीचा सॅमसग जे 7 मोबाईल त्याच्याकडून हस्तगत केला. आरोपीस पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
-----------

Post a Comment

0 Comments