Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसेना सर्वाना सोबत घेऊन चालते त्यामुळे सामान्य तरूणाला न्याय, आदर, मान मिळतोच.- उपशहर प्रमुख अल्हाट


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर  -   आपण गेल्या 30 वर्षापासून नगर शहरात पाहत आहोत की, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन शिवसेना काम करत आहे. त्यामुळे शिवसेनेची नाळ तळागळातील लोकांशी जुळलेली आहे. हाच एक पक्ष असा आहे की त्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी 24  7 नगर शिवालय कायम खुले असते. समाजातील कोणताही सामान्य नागरीक थेट अनिल राठोड यांच्याशी संपर्क साधु शकतो आणि आपल्या अडचणी सांगु शकतो. त्या अडचणी सोडवण्याचे काम आजपर्यत त्यांनी केले आहे.आज माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उपशहरप्रमुख पद देऊन समाजामध्ये मान दिला आहे. शिवसेना सर्वाना सोबत घेऊन चालते त्यामुळे सामान्य तरूणाला न्याय, आदर, मान मिळतोच. असे प्रतिपादन उपशहर प्रमुख जेम्स अल्हाट यांनी केले. 
 ख्रिश्‍चन सेवा संघाचे शहर जिल्हा अध्यक्ष जेम्स अल्हाट यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदी निवड केल्याचे पत्र शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, मेजर मिरपगार, जॉन गायकवाड, भालचंद्र भाकरे, शिंदे मामा  व ख्रिश्‍चन समाजातील बांधव उपस्थित होते. 
 याप्रंसगी अभिषेक कळमकर म्हणाले, शिवसेनेत आल्यानंतर मला हा विश्‍वास झाला की, सर्व सामान्याचे प्रश्‍न आणि त्यांचे रक्षण फक्त शिवसेनाच करू शकते. त्यामुळे जनतेमध्ये शिवसेनेबद्दल विश्‍वास आहे आणि नगरच्या जनतेचा कौल कायम शिवसेने सोबतच होता, आहे आणि राहणार. 

Post a Comment

0 Comments