Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कामरगाव घाटात उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात १८ लाखांचा मुद्देमाल जप्त


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - कामरगाव घाटात १८ लाख ४८ हजार ४०० रुपये दमन निर्मिती विदेशी मद्याचा साठ राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने पकडली.
याबाबत मिळलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. अहमदनगर पासून कामरगाव घाटापर्यंत आयशर ट्क (जी जे ०१, एच.टी.१२६२) यातून दमण दारू जात आहे. या माहितीनुसार सुर्वे यांनी सूचना दिलेल्या पथकाने ट्रकाचा पाठलाग करून थांबवून तपासणी केली. यावेळी प्लास्टिकने भरलेल्या गाण्याखाली दडवून ठेवलेला दमन दारू साठा मिळून आला. यात ६०×७५० मि.ली. क्षमतेच्या ओल्डमंगच्या सिलबंद बाटल्या ३१,२०० रु. मँकडाँल न.२ व्हिस्की बंद बाटल्या ३६००० रु. आँफीस चाँईस ब्ल्यु व्हिस्की सिलबंद बाटल्या ३३ हजार ६०० रु. राँयल स्पेशल व्हिस्की बंद बाटल्या १ लाख ४४ हजार रु., किंगफिशर बिअर सिलबंद बाटल्या १५ हजार रु., एल एल डि पी ई पावडरच्या १२० प्लॅस्टिकाच्या सिलबंद गोण्या ३ लाख १८ हजार रु. आणि आयशर टेम्पो १२ लाख ७० हजार रु. एकूण १८ लाख ७० हजार रु.चा मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ,ई) ६६, ८०, (१) ८३, ९८(२) नुसार जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक पराग नवलकर, निरीक्षक डि एल जगताप, एस एम सराफ, ए बी बनकर, बी टी घोरतळे, दुय्यम निरीक्षक डि बी पाटील, पी यु देशमुख, वर्षा घोडे आणि काळे, ठुबे, गदादे, बिटके ही कारवाई आदींनी केली. पुढील तपास भरारी पथक क्र.१ चे निरीक्षक डि एल जगताप हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments