आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीचे ते भाजपचे असो शिवसेना या पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा आयपीआयकडून प्रचार करून युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणा असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार करणार आहेत. पक्षातील काही नाराजीची लवकरच नाराजी दूर केली जाईल. निवडणुकीत कार्यकर्ते आपली भुमिका मांडत असतात. परंतु निवडणूक कोणी लढवायची तो निर्णय पक्षाचे अध्यक्ष आठवले साहेब घेतात. त्यामुळे आम्ही आरपीआय नगर जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार आहोत, असे साळवे यांनी सांगितले.
यावेळी आरपीआयचे विनोद भांबळ, भाऊसाहेब साळवे, जितू ठोंबे, शिवाजी साळवे, सचिन साळवे, गायकवाड आदीसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments