Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ढाकणवाडी (वडगाव) ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांचे निवेदन 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः विधानसभा 2019 या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत, असे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी (वडगाव) ग्रामस्थांनी दिले आहे.
  निवेदनात देश  महासत्ता होत असताना ढाकणवाडी (वडगाव) ग्रामस्थ 2019 मध्ये रस्ता, पाणी व विज या मुलभूत गरजांपासून आजरोजी वंचित आहोत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील मागील पंचवार्षिक योजनेत चिंचपूर, वडगाव, ढाकणवाडी, चिंचपूर गावठण (ढाकणवाडी कोतण) हा रस्ता आरखड्यामध्ये असून सुद्धा तो झाला नाही. त्या रस्त्याचे भूमी अधिग्रहणासारखे (की जो बेलपारा मध्यम प्रकल्पामुळे पुर्नवसन झालेला आहे).
 प्रश्न प्रलंबित असून, रस्ता अतिक्रमणाने वेढलेला आहे. डोेंगरघाट हा धोकादायक बनलेला आहे. त्यावर गेल्या वर्षी मोठा अपघात होऊन 10 ते 15 माणसे जखमी झाली होती. त्या अपघातात काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. विजेचा प्रश्न फक्त कागदवरच आहे. दिवसातील 24 तासातील फक्त काही तासच विज उपलब्ध असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासारखी योजना असून सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करता ग्रामस्थांनी बैठक घेऊन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
 निवेदनावर आदिनाथ विश्वनाथ बडे, विष्णू किसन ढाकणे, विठ्ठल बाबू ढाकणे, सुर्यभान निवृत्ती ढाकणे, रविंद्र बबन ढाकणे, बाळासाहेब विक्रम ढाकणे, नवनाथ दत्तात्रय ढाकणे, लक्ष्मण भगवान ढाकणे, दत्तू राधाजी ढाकणे, नारायण गोपाळा ढाकणे, बबन ज्ञानदेव बडे, संभाजी आश्रुबा ढाकणे, कृष्णा विठ्ठल गिते आदींसह 100 ते 150 ग्रामस्थांच्या सह्या निवेदनावर आहेत.

Post a Comment

0 Comments