Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात पक्षाच्या प्रचार गाड्यांची वाढली स्पर्धा

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः नगर शहर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचाला चांगलाच वेग आला आहे. मतदानाला काही दिवसांचा अवधी उरला असल्याने अनेक पक्षांच्या उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
 त्या पार्श्वभूमीवर नगर शहरात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपा युती या दोन्ही पक्षामध्ये प्रचारासाठी चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. प्रत्येक शहरातील प्रभागातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. हे दृश्य मंगलगेट परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाहण्यास मिळाले. या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या उमेदवार प्रचार गाड्या एकाचवेळी य परिसरात फिरत होता. यावेळी दोन्ही प्रचार गाड्यांची जणू स्पर्धाच लागली असल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले. अशी अवस्था संपूर्ण नगर शहरात सुरु झाली आहे. यामुळे या प्रचारयंत्रणेमुळे नागरिकांचा एकप्रकारे टाईमपास  होत आहे. 

Post a Comment

0 Comments