Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विरोधकांकडून विकासकामांत खोडा घालण्याचे पाप - संग्राम जगताप

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः महापौर असताना राज्य सरकारकडून सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी मोठा निधी मंजूर करून आणला होता. परंतु विरोधी उमेदवारांनी हा सीनानदी सुशोभीकरणाचा प्रकल्प बंद करण्याचे काम केले. त्यामुळे तो निधी परत शासनाकडे वर्ग झाला. तसेच तपोवन रोडसाठी शासनाकडून साडेतीन कोटी रुपये मंजूर केल्यानंतर त्यांनी हाही रस्ता बंद पाडण्याचे काम सुरू केले, परंतु या रस्त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून रस्त्याचे काम सुरू केले. त्यांनी या रस्त्याच्या कामामध्ये आडकाठी आणली नसती, तर तपोवन रस्त्याचे काम पूर्ण झाले असते. नगर शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम आम्ही केले आहे. त्यांनी मात्र प्रत्येक विकासकामांत खोडा घालण्याचे पाप केले, अशी टीका संग्राम जगताप यांनी केली.
प्रभाग क्रमांक 2 मधील प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी माजी नगरसेवक निखिल वारे, विनित पाउलबुधे, संतप बारस्कर, सुनील त्र्यंबके, संजय बुधवंत, बाळासाहेब भुजबळ, कुमार वाकळे, निवृत्ती आरू आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगताप म्हणाले, नगर शहरातील प्रत्येक प्रभागात कमीत कमी 50 विकासकामे केली आहेत. त्यांनी त्यांच्या 25 वर्षांतील एक, तरी विकासकाम दाखवावे, असे आव्हान संग्राम जगताप यांनी दिले. वारे म्हणाले, तरुणांना समाजकार्यात आणून जगतापांनी समाजाचे प्रश्न सोडवून घेतले. तीन वेळा नगरसेवक केले, विकासकामे करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. ज्यांची नगरसेवक व्हायची पात्रता नाही त्यांना जगताप यांनी महापौर केले, असेही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments