Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-पाथर्डीत कोण माघार घेतात यावर ठरणार ढाकणे-राजळे यांची यश, अपयश


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पक्षावतीने सहा तर अपक्ष ११ उमेदवारांनी शुक्रवारी (दि.४) अखेर उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. अपक्षांमधून कोण-कोण माघार घेत यावर तालुक्यातील निवडणूक अंवलबून राहणार आहे.
वास्तविक पाहता अमोल गर्जे यांनी माघार नाही, घेतल्यास त्याचा तोटा हा भाजपाचे उमेदवार मोनिकाताई राजळे यांना होणार आहे. त्यामुळे त्यांना थोपविण्यात राजळे यांना यश येते की नाही ते समोर येईल. गर्जे यांनी उमेदवारी ठेवली तर यात ते भाजपचे मते घेतली, तर जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदाताई काकडे यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे नाही घेतल्यास त्यांचा तोटा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अँड प्रताप ढाकणे यांना होऊ शकतो. त्यांचे कारण म्हणजे, काकडे या पूर्वीपासूनच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात काम करत आल्या आहेत. त्यात ढाकणेंना निवडून आणण्यासाठी दोन्ही घुले बंधूनी पुढाकार घेतला आहे. यात काकडे यांचा शेवगाव परिसरात चांगलेच अस्तित्व आहे, त्यामुळे त्यांनी माघार नाही घेतल्यास त्यांचा तोटा राष्ट्रवादी काँग्रेसचे ढाकणे यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवार (दि.७) या माघारीच्या दिवशी कोण-कोण माघार घेतात, ते दिसेल. वास्तविक पाहता राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला, त्यास भाजपातील अनेकांनी विरोध केला आहे, ही बाब भाजपच्या नेत्या व वंजारी समाज्याच्या नेत्या म्हटल्या जातात, त्या पंकजाताई मुंडे यांच्यापर्यंत गेली. पण मुंडे यांनी पराळी मतदारसंघातील मराठा मतदार याकडे पाहून स्वार्थी राजकारणामुळे राजळे यांना उमेदवारी देऊन पाठराखण केली. ही बाब वंजारी समाजाच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भविष्यात पाथर्डीतील वंजारी समाज मुंडे यांना किती प्रतिसाद देता तेही दिसणार आहे. या सर्व घडामोडी राजळे अथवा ढाकणे यांच्या कोणाच्या पथ्यावर पडतात ते दि.७ आँक्टोबरनंतर पाहण्यास मिळणार आहे.
या आमदारकीच्या निवडणुकीसाठी
मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष आणि भाजप), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), अमोल गर्जे (अपक्ष आणि भाजप), विठठल वाघ (अपक्ष), संदीप शेलार (अपक्ष), धीरज बताडे (राईट टु रिकॉल), ज्ञानेश्वर जाधव (जय महाभारत), संजय लहासे (अपक्ष), सुभाष साबळे (बहुजन समाज पार्टी), नीलेश ढाकणे (अपक्ष), प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), प्रभावती माधवराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), कमरुद्दिन दगडु शेख (एमआयएम), सुनिल मोहनराव पाखरे (अपक्ष), सदाशिव सटवाजी शिंदे (अपक्ष), सचिन नानासाहेब उगले (अपक्ष), बाबासाहेब सुखदेव ढाकणे (अपक्ष-१), किसन नामदेव आव्हाड (अपक्ष)आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

Post a Comment

0 Comments