Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गोमांस वाहतूक करणारा पिकअप पकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; एलसीबीची कारवाई


आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
संगमनेर - येथे एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबी पथकातील हेडकाँ दत्ता गव्हाणे, पोना रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, पोकाँ सुनिल सुलाने यांनी १ लाख ६२ हजार रु.चे १३५० किलो गोमांस व २ लाख ५० हजार रु. किंमतीचा पिकअप गाडी असा एकूण ४ लाख १२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक- पुणे महामार्गावर खांडगाव फाटा येथे पुलाखाली पोलिसांनी सापळा लावून संगमनेर कडून यशवंतनगर वैदुवाडी मार्गे पिकअप (क्र.४६ एआर, ५९४१) पकडला. यात अझरुद्दीन जमालुद्दीन शेख (वय २५ रा.कुर्ला, कसाईवाडा, कुरेशीनगर मुंबई), समीर अब्दुल मजीद कुरेशी (वय २२, शिवाजीनगर, लोटस काँलनी, मुंबई) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, बुंदी उर्फ मुद्दसीर अब्दुल करीम कुरेशी (रा.संगमनेर ता.जि.अहमदनगर) यांच्या सांगण्यावरुन गोमांस विक्रीसाठी घेऊन जात आहे, पकडण्यात आलेल्या शेख व कुरेशी यांनी पोलिसांना सांगितले. त्याच्या ताब्यातून १ लाख ६२ हजार रु.चे १३५० किलो गोमांस व २ लाख ५० हजार रु. किंमतीचा पिकअप गाडी असा एकूण ४ लाख १२ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Post a Comment

0 Comments