Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपयुमोच्या ‘युवा संवाद’ला मोठा प्रतिसादआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - सारडा कॉलेज येथे भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने नव मतदारांसाठी कॉफी वुईथ युथच्या माध्यमातून युवा संवाद हा कार्यक्रम
आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी युवा खासदार उन्मेष दादा पाटील
यांनी युवकांबरोबर संवाद साधून त्यांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली.
  यावेळी उपस्थितीत युवकांनी खासदार पाटील यांच्याबरोबर सध्याच्या राजकारणासह विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी तरूणांच्या प्रश्नांना खासदार पाटील यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांनी तरूणांनी मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खासदार उन्मेष पाटील यांचा सत्कार भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी केला. यावेळी तांबे कार्यक्रमाची संकल्पना सांगून जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या कामाची देखील माहिती दिली.
  खासदार उन्मेष पाटील यांनी तरूणांनी युवकांचे रोजगार, जिल्ह्यातील उद्योग, आरोग्य सुविधा, शेतीचे प्रश्न यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? अनेक अभ्यासपूर्वक प्रश्नांची विचारणा केली. खासदार पाटील यांनी देखील तरूणांच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर अतिशय योग्य व समाधानकारक दिल्याने उपस्थितीत तरूणांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.
या कार्यक्रमावेळी काश्मिर प्रश्नावर तरूणांनी काश्मिर प्रश्व व  कलम ३७० बाबतही प्रश्न विचारले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये असे की, प्रथमतःच युवकांना आपल्या मनातील विकासाचे मत व विचार मांडण्याची नव मतदारांना संधी मिळाल्याने मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाला उप महापौर मालनताई ढोणे, प्रदेश पदाधिकारी किशोर वाकळे, विनोद दळवी, संतोष साबळे, सुरेंद्र गांधी,
नगराध्यक्ष सत्यजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, सरचिटणीस मनोज कोकाटे, आकाश त्रिपाठी, अंकुश भडांगे, मिलींद भालसिंग, केशव दवंगे, बाळासाहेब पानगव्हाणे, उमेश साठे, ईश्वर वाकचौरे, कैलास गर्जे, आशिष भगत, आज्यु शेख, सचिन वायकर, वाल्मिक देशमुख, विनोद प्रेमाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्रीराज डेरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments