Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साईबाबा महाविद्यालयात प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन जागरूकता अभियान


आँनलाईन न्यूज नेटवर्क, नगर रिपोर्टर
राजेंद्र दुनबळे
 शिर्डी -  साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन जागरूकता अभियान राबविण्यात आले.संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले.  प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन जागरूकता अभियान कार्यक्रमास अधिक्षक राजेंद्र कोते,दिनेश कानडे,प्रा.शिवाजी ढोकणे,प्रा.अमोल कचरे,प्रा.दिपक पटारे,प्रा.स्वप्नाली खांडरे,प्रा.सोनाली हरदास,प्रा नितिन पावसे,प्रा विकास भांड,प्रा शीतल धरम,प्रा.नानासाहेब गुंजाळ,डॉ.सुनिता वडीतके, डॉ.योगिता कोपटे, प्रा.प्रशांत हासे,प्रा.प्रदीप शेलार, प्रा.सदाफळ, प्रा गणेश मगर,डॉ.गणेश भांड,प्रा सुनिल कवडे, प्रा.साळवे, भाऊसाहेब शिंदे,प्रशांत शेळके,मनोज बकरे,रामनाथ कासार,सुदाम कालेकर आणि महाविद्यालयीन कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी जेम इन्व्हायरो या पर्यावरण विषयक जागृती करणा-या संस्थेचे अशोक पारीक यांनी विद्यार्थ्यांना  या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन जागरूकता विषयावर मार्गदर्शन केले.प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यापासून तयार केलेले धागे,टी शर्ट इत्यादी वस्तू दाखवल्या.
मांडतो.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ संतोष औताडे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Post a Comment

0 Comments