Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात युतीची पिछेहाट तर राष्टवादी ७ तर काँग्रेस 2 जागा ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  जिल्ह्यातील 12 विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राधाकृष्ण विखे पा., मोनिका राजळे व बबनराव पाचपुते निवडून आले तर राष्ट्रवादीकडून किरण लहामटे, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, निलेश लंके, संग्राम जगताप,  रोहित पवार आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व लहू कानडे ही सर्व मंडळी निवडून आली आहेत. सर्वात जास्त लिडने शिर्डी मतदारसंघातून भाजपाचे राधाकृष्ण विखे- 86235 इतक्या मताने निवडून आले आहेत.शिवसेनेचा जिल्ह्यातून एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांचा सुपाटा साप झाला आहे.
विधानसभा मतदारसंघातून निवडून उमेदवार एकूण मते याप्रमाणे अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी,112830मते विजयी), वैभव पिचड (भाजपा 55427 मते). संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस124354मते विजयी), साहेबराव नवले ( शिवसेना 62870मते). शिर्डी - राधाकृष्ण विखे (भाजपा 131394 मते विजयी), सुरेश थोरात (काँग्रेस 45159मते). कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी 77669मते विजयी), स्नेहलता कोल्हे (भाजपा 75255 मते). श्रीरामपूर- लहू कानडे (काँग्रेस 88347 मते विजयी), भाऊसाहेब कांबळे (शिवसेना 70375मते). नेवासा- शंकरराव गडाख (शेतकरी 103108 मते विजयी), बाळासाहेब मुरकुटे (भाजपा 75636मते). शेवगाव- मोनिका राजळे (भाजपा 109044 मते विजयी), प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी 94526 मते). राहुरी-प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी 108273मते विजयी), शिवाजी कर्डिले (भाजपा 85061मते). पारनेर-निलेश लंके (राष्ट्रवादी 138570मते विजयी), विजय औटी (शिवसेना 102403 मते). अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी 77945मते विजयी),  अनिल राठोड (शिवसेना 68189मते). श्रीगोंदा- घनश्याम शेलार (राष्ट्रवादी 97980 मते ), बबनराव पाचपुते (भाजपा 70420मते विजयी). कर्जत-जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी 99576मते विजयी), राम शिंदे (भाजपा 69355मते).
लिड याप्रमाणे - किरण लहामटे - 57403, बाळासाहेब थोरात-61484, राधाकृष्ण विखे- 86235, आशुतोष काळे- 2414, लहू कानडे - 17972, शंकरराव गडाख - 27472, मोनिका राजळे- 14518, प्राजक्ता तनपुरे-23212, निलेश लंके- 59234, संग्राम जगताप- 9756, , रोहित पवार - 30221 लिडने ही सर्व उमेदवार निवडून आले आहेत.   

Post a Comment

0 Comments