Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात एलसीबीचे 7 ठिकाणी अवैध दारुधंद्यांवर छापे ; 1 लाख 57 हजारा मुद्देमाल जप्त


ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली, जामखेड व श्रीगोंदा पोलिस ठाणे हद्दीमध्ये सुुरु असणार्‍या अवैध दारु विक्री करणार्‍या व्यक्तीविरुद्ध धडक कारवाई करून 1 लाख 57 हजार 141 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 7 जणांवर करण्यात आलेल्या कारवाईत एका महिलेचा समावेश आहे.
 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यात रंगोली हॉटेल येथे छापा टाकून देशी-विदेशी 6 हजार 511 रुपयांची दारू जप्त केली. यात विष्णू सखाराम इंगळे (वय 40, रा. वारंगा, ता. कळमनूर, जि.हिंगोली, ह.रा. रंगोली हॉटेल, ता.जामखेड) व दुसर्‍या ठिकाणी छापा टाकून 1 हजार 646 रुपयांची विदेशी दारु जप्त केली. यात महेश माणिक काळे (वय 42, रा.खडकवाडी,ता.जामखेड). कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत एक बुलेट (एमएच 16 बीएल-9100) व देशी-विदेशी दारु असा 83 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त यात अविनाश रघुनाथ खाकाळ (वय 38, रा.अंभोरा, ता. आष्टी जि.बीज) यांच्या गुन्हा दाखल केला आहे. श्रीगोंद्यात तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात गावठी दारु व कच्चे रसायन 15 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त, राजू बथुर्‍या काळे (वय 45 रा. शिपलकर वाडी), गावठी दारु, कच्चे रसायन व हातभट्टी साधणे असा 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, यात आवडाबाई जातमहाल भोसले (रा.शिपलकरवाडी) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तर 12 हजार रुपयांचा गावठी दारु, कच्चे रसायन व हातभट्टीची साधणे असा मुद्देमाल जप्त केला असूून बजरंग ढालाजी गिर्‍हे (रा.शिरसगाव बोडखा) आदींवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडकेबाज कारवाई केली आहे. 

Post a Comment

0 Comments