Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुख्यात गुन्हेगार चांगदेव भोसले यांच्यासह 13 जणांवर मोक्कातंर्गत कारवाई मंजुरी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार चांगदेव भारम भोसले (रा.पढेगाव ता.कोपरगाव) व त्याच्या टोळीतील 12 सदस्य असे एकूण 13 जणांविरुद्ध मोक्कातंर्गत कारवाईस मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांनी दिली.
  मोक्कातंर्गत कारवाईत हिरु वडोद भोसले (वय 36, रा.पढेगाव ता.कोपरगाव), भगिरथ वडोद भोसले (वय 28, रा. पढेगाव ता.कोपरगाव), ज्ञानेश्वर पांडरंग जाधव (वय 24, रा. वडगाव ता.कोपरगाव), करण बाळू मोहिते (वय 25 रा. धुळगाव ता.येवला, जि.नाशिक)
फरार झालेले आरोपी नामदेव फुलचंद भोसले (रा.वडगाव ता. कोपरगाव), भागवत भारम भोसले (रा.पढेगाव ता.कोपरगाव), दगू वडोद भोसले (पढेगाव ता.कोपरगाव), दीपक भारम भोसले (रा. पढेगाव ता.कोपरगाव), भिवसेन भारम भोसले (रा.पढेगाव ता.कोपरगाव), पांडुरंग फुलचंद भारम भोसले (रा.पढेगाव ता.कोपरगाव), विजय चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही रा. कोपरगाव), पांडुरंग फुलचंद जाधव (रा.वडगाव ता.कोपरगाव) आदींचा समावेश आहे.
गुन्हे संघटीतपणे केलेले असल्याने या संबंधित टोळीनेविरुद्ध पोलिस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलिस ठाणे यांनी मोक्का प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का मंंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (॥). 3(2), 3(4) (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधीक्षक, शिर्डी हे यांच्याकडे देण्यात आला आहे.
 अशा प्रकारे नगर जिल्ह्यातील 7 ते 8 टोळीविरुद्ध कारवाई प्रस्तावित असून, सदर टोळ्यावर आगामी काळात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments