Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आत जिल्ह्यात 12 मतदारसंघात कोण होणार आमदार

नेवासा मतदारसंघात सर्वाधिक तर नगर शहरात सर्वात कमी मतदान

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर : आत जिल्ह्यातील 12 मतदारसंघात कोण होणार आमदार याविषयावर सर्वच तालुक्यांमध्ये चर्चा सुरु  झाली आहे. गुरुवारी (दि.24) दुपारापर्यंत याविषयांचा निकाल प्रत्येक तालुक्यातून पुढे येईल. पण कार्यकर्त्यांनी तालुक्यात नेमके कोण आमदार होणार आहे. याबाबत तर्कविर्तक सुरु केले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी लागणार्‍या निकालाकडे सर्वचेच लक्ष लागले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बाराही मतदारसंघात सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील मतदानाची सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे- अकोले मतदारसंघ- सरासरी 68.20 टक्के, संगमनेर मतदारसंघ - 71.72,  शिर्डी- 70.67, कोपरगाव - 76.23, श्रीरामपूर - 63.93, नेवासा - 80.07, शेवगाव - 65.65, राहुरी - 68.37, पारनेर - 70.23, अहमदनगर शहर-58.28, श्रीगोंदा- 67.66 आणि कर्जत-जामखेड - 73.98 टक्के.
मागील विधानसभा निवडणुकीतील (2014) मतदानाची टक्केवारी - अकोले मतदारसंघ- सरासरी 67.56 टक्के, संगमनेर मतदारसंघ - 71.70,  शिर्डी- 76.85, कोपरगाव - 79.95, श्रीरामपूर - 68.85, नेवासा - 74.50, शेवगाव - 72.86, राहुरी - 71.26, पारनेर - 68.31, अहमदनगर शहर-60.05, श्रीगोंदा- 73.65 आणि कर्जत-जामखेड - 66.04 टक्के.
दरम्यान, मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  विधानसभा निवडणुकी साठीची मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. त्याठिकाणी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. विशेषता तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे. तेथील मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही, व्हीडिओग्राफीची सुविधा, मतमोजणी केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, मतमोजणी केंद्राच्या परिसरातील चोख सुरक्षा व्यवस्था अशा पद्धतीने आपण तयारी करण्यात आली आहे.
अकोले मतदारसंघाची मतमोजणी कोल्हार-घोटी रोडवरील पॉलीटेक्निक कॉलेज, अकोले. संगमनेर मतदारसंघाची मतमोजणी सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात स्पोर्टस कॉम्प्लेक्स,संगमनेर. शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी राहाता येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोपरगाव येथील मतमोजणी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव. श्रीरामपूर मतदारसंघाची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, श्रीरामपूर. नेवासा मतदारसंघाची मतमोजणी नवीन शासकीय गोडावून सेंट मेरी स्कूल जवळ, मुकींदपूर येथे होणार आहे. शेवगाव मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय शेवगाव. राहुरी मतदारसंघाची मतमोजणी लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्टस, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, राहुरी. पारनेर मतदारसंघाची मतमोजणी न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पारनेर. अहमदनगर शहर मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. 4, एमआयडीसी नागापूर येथे होणार आहे.
  श्रीगोंदा मतदारसंघाची मतमोजणी ही पेडगाव रोडवरील शासकीय गोदाम, श्रीगोंदा येथे तर कर्जत-जामखेड मतदारसंघाची मतमोजणी नवीन तहसील कार्यालय, कर्जत येथील शासकीय गोडावून येथे होणार आहे.        

Post a Comment

0 Comments