Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा बँकेला राज्य शासनाचा 'सहकारनिष्ठ' पुरस्कार जाहीर

नगर रिपोर्टर

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला  सहकारनिष्ठ  पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे,
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था यांना सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार यांची नावे शासनाच्या परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहेत. राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या एकूण कामकाजाच्या संदर्भात अभ्यास करून शासनाची कमिटी या पुरस्कारासाठी राज्यातील जिल्हा बँकेची निवड करते. त्यानुसार नगर जिल्हा बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नगर जिल्हा सहकारी बँकेला  सहकारनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले, नगर जिल्हा बँकेस स्थापनेपासून उत्कृष्ट नेतृत्व लाभल्याने व बँक सेवक कार्यक्षमतेने काम करत असल्याने जिल्हा बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार बँकेचा सन्मान असून बँकेचे सभासद, ठेवीदार व शेतकरी यांचा बँकेवर विश्वास असल्याने बँकेची प्रगती होत आहे. बँकेने नेहमीच जिल्ह्याच्या विकासाचे काम केले केले असून, सहकार क्षेत्रात बँकेचे मोठे योगदान आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी  दिली.

Post a Comment

0 Comments