Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी आमदार, खासदारांचे वाद म्हणजे तिसराच नगर शहरात आमदार होण्याची नांदी !


नगर रिपोर्टर 
अहमदनगर -  राज्यात अनेक दिवसांपासून अनेक कुरकुरी शिवसेना-भाजप युतीमध्ये झाल्या. त्या समाजस्यांने संपुष्टातही आल्या. परंतु अहमदनगर येथील शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड व भाजपाचे माजी खा.दिलीप गांधी यांच्यामधील कुरकुरी अद्यापही शांत होण्याच्या परिस्थित दिसून येत नाही. असेच वातावरण नगर शहरात शिवसेना-भाजपामध्ये राहिल्यास तिसर्‍यांचा फायदा होईल, अशी दबक्या आवाजात युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये  सूर उमटू लागल्या आहेत.
  वास्तविक नगर शहरावर अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून युतीची चांगलीच पकड होते. परंतु युतीतील माजी आमदार अनिल राठोड, माजी खा.दिलीप गांधी व अ‍ॅड. अभय आगरकर या तिन्ही गटाचा कलह दिवसेंदिवस वाढत गेल्याने आजरोजी तरी, युतीतील मतभेद विकोपाला गेले आहेत. यापूर्वीही माजी खासदार दिलीप गांधी यांचे खासदाराकीची उमेदवारी कापून ती उमेदवारी डॉ. सुजय विखे पा. यांना मिळाली. त्यांचा चांगलाच आनंद शिवसेनेला झाला पण शहर भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यात येत्या विभानसभेमध्ये शिवसेना व भाजपाची युती होईल अथवा नाही, हे योग्य वेळीच समजेल. पण नगर शहर विधानसभाची जागा भाजपालाच मिळावी, यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. प्रामुख्याने यात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांना विरोध असल्याचे हे जगजाहीर आहे. सध्या नगर शहरात विधानसभा निवडणुकीच्या चांगलेचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार दिलीप गांधी यांना पत्रकार परिषद बोलवून त्यात नगरकरांना विकास हवा आहे, कंपन्या बंद पडल्या आहेत. त्या उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यामुळेच नगरची जागा भाजपला मिळावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती माजी खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.
 युती झाली तर मागील 25 वर्ष ज्यांना उमेदवारी दिली त्यांना आमचा विरोध राहणार आहे. आम्हाला माजी आमदार अनिल राठोड चालणार नाही. त्यांना आम्ही चालत नसेल, तर आम्हाला पण ते चालणार नाही. लोकसभेला मित्र पक्ष म्हणून आमच्यावर आरोप करत होते. आता आम्हाला पण ते नको आहेत, असे गांधी यांनी म्हटले आहे. या माजी खा. गांधी यांच्या पत्रकार परिषदेमुळे शिवसेनेनेही माजी खा. दिलीप गांधी यांना मोठा विरोध सुरु केला आहे. माजी आमदार अनिल राठोड यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच कसा असावा, याबाबत शिवसेने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत चर्चा केली आहे. शिवसेना-भाजपाची युती राहिली तरी, नगरची जागा कुणाकडेही गेली तरी, दोघा उमेदवारांना एकमेंकाचा विरोध असणार आहे, हे आता शिवसेना-भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ओळखले आहे. या विरोधामुळेच नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा बाहेरील तिसर्‍याच उमेदवारास देण्याच्या मानसिकतेत शिवसेना व भाजपाचे वरिष्ठ नेते पोहचले असल्याचे विश्वासून सूत्रांनी सांगितले आहे.
  त्यामुळे माजी आमदार राठोड व माजी खासदार गांधी या दोघांच्या भांडणाचा फायदा तिसर्‍याला होणार आहे. तसेच संकेत वरिष्ठा पातळीवरील हालचालीवरून दिसून येऊ लागले आहे. याचा परिणाम म्हणजे राठोड व गांधी यांच्याजवळील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुरावा करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा सध्या नगर शहरात जोरात सुरु झाली आहे.  

Post a Comment

0 Comments