Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या सर्वाधिक


जिल्ह्यात एकूण 16 लाख 62 हजार 834 तर शेवगाव मतदारसंघात 1 लाख 62 हजार महिला मतदार

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. विधानसभेसाठी सर्वाधीक महिला मतदारांची संख्या 1 लाख 62 हजार 170  ही 222-शेवगाव विधानसभा मतदारसंघात आहे तर जिल्ह्यातील 12 मतदारसंघात महिला मतदारांची संख्या 16 लाख 62 हजार 834 इतकी आहे.
      भारत निवडणूक आयोगाने 31 जानेवारी 2019 रोजीच्या अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी करण्यात आली. त्यानुसार 12 विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार हे 34 लाख 68 हजार 522 इतके आहेत. जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून त्यात 216-अकोले हा अनुसूचित जमातीसाठी तर 220-श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. उर्वरित 217-संगमनेर, 218-शिर्डी (राहता), 219-कोपरगाव, 221-नेवासा, 222-शेवगाव, 223-राहुरी, 224-पारनेर, 225-अहमदनगर शहर, 226-श्रीगोंदा आणि 227-कर्जत-जामखेड हे मतदारसंघ अराखीव आहेत.
            216- अकोले (अ.ज) मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 2 लाख 53 हजार 969 इतकी आहे. यात पुरुष मतदार संख्या 1 लाख 32 हजार 853 इतकी तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 21 हजार 115 आहे. इतर मतदार 01 आहे.  217- संगमनेर मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 39 हजार 755 असून महिला मतदार 1 लाख 29 हजार 528 आहेत. या मतदारसंघात एकूण मतदार 2 लाख 69 हजार 283 इतकी आहे. 218-शिर्डी मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या  2 लाख 62 हजार 164 असून यात पुरुष मतदार 1 लाख 35 हजार 891 तर महिला मतदार 1 लाख 26 हजार 263  आणि इतर मतदार 10 आहेत.
            219-कोपरगाव मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 34 हजार 956 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 29 हजार 426 आणि इतर 06 मतदार असे एकूण 2 लाख 64 हजार 388 मतदार आहेत. 220- श्रीरामपूर (अ.जा.) मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 46 हजार 479 असून महिला मतदार 1 लाख 40 हजार 18 आहेत. या मतदारसंघात इतर मतदार 55 असून एकूण मतदार 2 लाख 86 हजार 552 इतकी आहे. 221-नेवासा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 37 हजार 620 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 24 हजार 515 आणि इतर 02 मतदार असे एकूण 2 लाख 62 हजार 137 मतदार आहेत.
            222-शेवगाव मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 78 हजार 214 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 62 हजार 170 आणि इतर 06 मतदार असे एकूण 3 लाख 40 हजार 390 मतदार आहेत. 223-राहुरी मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 53 हजार 141 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 38 हजार 107 आणि इतर 02 मतदार असे एकूण 2 लाख 91 हजार 250 मतदार आहेत. 224-पारनेर मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 66 हजार 556 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 53 हजार 545 असे एकूण 3 लाख 20 हजार 101 मतदार आहेत. 225-अहमदनगर (शहर) मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 48 हजार 852 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 40 हजार 180 आणि इतर 74  मतदार असे एकूण 2 लाख 89 हजार 106 मतदार आहेत.
            226- श्रीगोंदा मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 3 लाख 10 हजार 229 इतकी आहे. यात पुरुष मतदार संख्या 1 लाख 62 हजार 349 इतकी तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 47 हजार 877 आहे. इतर मतदार 03 आहे.  227- कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 3 लाख 18 हजार 953 इतकी आहे. यात पुरुष मतदार संख्या 1 लाख 68 हजार 860 इतकी तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 50  हजार 90 आहे. इतर मतदार 03 आहे.   

Post a Comment

0 Comments