Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चहा येता-जाता पिणं आरोग्यासाठी घातकच !आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / आरोग्यधारा
आपण चहा का पितो ? तो तब्येतील चांगला की वाईट ? किती चहा प्यायला परवानगी असते ? चहा दुधाचा प्यावा की कोरा, हे असे अनेक प्रश्न चहाशी निगडित आहेत. याची उत्तर मिळाली की चहा आरोग्यासाठी चांगला की वाईट यांच उत्तर सहज मिळू शकतं.
चहा म्हणजे गरम पाण्यात कँमेलिय सिनेन्सिस या वनस्पतीची कोवळी, हिरवी पान टाकून बनवलेलं पेय होय. याचा विशिष्ट स्वाद आणि सुगंध तसंच तरतरी देणारा गुणधर्म लोकांना आकष्ट करून वारंवार पिण्यास भाग पाडतो.
कमी प्रमाणात चहा प्यायल्यास त्यातील अँण्टीआँक्सिडण्ट गुणधर्म शरीराला उपयोगी पडतो. शरीरातील विषारी किंवा टाँक्सिन्स त्यामुळे निघून जाण्यास मदत होते. ताज्या तोडलेल्या चहाच्या पानांमध्ये कँटेचीन हे चांगला उपयोगी तत्व ३० टक्के इतक असतं; पण पानं वाळवून त्याचा पत्ती बनवेपर्यंत हे प्रमाण कमी होत जातं. ज्या विशिष्ट गुणामुळे आपण चहा पितो तो महत्त्वाचा गुण म्हणजे लगेच तरतरी वाटण्याचा किंवा ऊर्जा मिळण्याचा! त्यासाठी त्यातील कँफेन आणि थियानिन ही उत्तेजक द्रव्यं ३ टक्क्यांपर्यंत असतात. यात अगदी कमी प्रमाणात कर्बोदके आणि प्रथिनं असतात.
चहा आणि त्रास
आयुर्वेदकाचेच्या दष्टीने पाहायला तर नुसता चहा हा चवीला तुरट, कडवट लागतो. त्यामुळे बऱ्याच जणांना चहा आणि तोही विशेषतः ब्लॉक टी प्यायल्यास पित्त होतं, जळजळ होते. दिवसातून जास्त वेळा चहा पिणं, अगदी गरम पिणं, भूक लागलेली असताना किंवा उपाशीपोटी चहा घेणं, रात्री किंवा वेळीअवेळी चहा पिणं या कारणांनी तो निश्चितच पित्त वाढवतो आणि त्रासदायक ठरतो. अशा अनियंत्रित चहा सेवनानं अल्सरसुध्दा होतो. स्थूलता असणाऱ्या व्यक्तींनी वारंवार भरपूर साखर आणि दूध घालून चहा प्यायला तर वजन अधिकच वाढतं. स्वतः चहा फार उष्ण किंवा थंड गुणाचा नाही; पण आपण इतर ज्या गोष्टी चव वाढविण्यासाठी वापरतो त्यामुळे तो बरेचदा उष्ण होतो. आलं,गवती चहा, सुंठ, तुळस किंवा दालचिनी, मिरे टाकून बनवलेला चहाचा मसाला यामुळे तो पित्त वाढवतो.
चहा स्वास्थ्यनुसार प्यावा
आपल्या प्रकतीनुसार चहा किती प्रमाणात आणि प्रमाणात आणि कशा प्रकारचा चालेल हे अवलंबून आहे. पित्त प्रकतीच्या व्यक्तींनी वारंवार आणि खूप उकळलेला आलं, गवती चहा वगैरे टाकलेला चहा प्यायला तर त्यांना तो सहन होत नाही. जिभेला फोड येणं, घशात आग होणं या तक्रारी जाणवू शकतात. चहा अगदी गरम गरम प्यायला तरी यांना त्रास होतो.
कफ प्रकतीच्या व्यक्तींना उष्ण, तीक्ष्ण पदार्थांनी काही त्रास होत नाही. कारण त्यांची स्वतंची प्रकती थंड असते. यांना अगदी नुकताच गाळलेला गरम चहा, त्यात तीक्ष्ण मसाले असले तरी तापदायक होत नाही. यात प्रकतीच्या व्यक्तींनाही गरम पदार्थ चालतात त्यामुळे गरम मसाला चहा यांना चालतो; पण मूळ स्वभाव चंचल आणि शिस्त कमी असल्यानं कधी अचानक चहा सोडून देतात, तर कधी भरपूर, वारंवार चहा पीत राहातात.
हानिकारक आहे की, फायदा
नुसता उकळलेला आणि कोरा, काळा, बिनदुधाचा चहा जास्त हानिकारक आहे. चहा खूप उकळला की त्याचे फायदे कमी होऊन त्रास वाढू लागतात. त्यामुळे थोडं दूध, थोडी साखर आणि थोडी चहा पावडर असा चहा प्यावा. म्हणजे पाणी उकळलं की साखर टाकून मग चहा टाकला की फार न उकळता लगेच दूध घालून गँस बंद करावा. नाहीतर चहा गाळून त्यात वरुन दूध घालावां. खरा गुणकारी चहा म्हणजे टीबँग्स वापरून गरम पाण्यात सात आठ वेळा बुडवून केलेला सौम्य चहा! डस्ट प्रकारात मोडणारे अगदी बारीक पावडर स्वरूपातील चहा पाण्यात खूप उकळला की अतिशय स्टाँग, उग्र चहा तयार होतो. काहींना असाच चहा प्यायला की तल्लफ भागते, पण ते चुकीचं आहे.  

Post a Comment

0 Comments