Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राजळे-ढाकणे पारंपरिक लढतीत गर्जे, बडे, काकडे रिंगणात उतारणार !


आँँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत राजळे-ढाकणे ही पारंपरिक घरण्यांची लढत समोर येते, परंतु या २०१९ च्या निवडणुकीत अमोल गर्जे, सरपंच धनंजय बडे व हर्षदाताई काकडे याही निवडणूक लढू इच्छत आहेत. या सर्वांनी आप आपल्या पद्धतीने प्रचार यंत्रणे सुरु केली आहेत. यामुळे निवडणुकीचे चांगलेच वातावरण तालुक्यात तापले आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ हा स्व.गोपिनाथ मुंडे यांना मानणारा असल्याने त्यामुळे भाजपचाच बालकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. त्यात ना.पंकजाताई मुंडे यांच्या आग्रखातर शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील जनतेने मोनिकाताई राजळे यांना आमदार केले. परंतु यानंतर आमदार राजळे यांनी भाजपातील संबंधितांना तोंडे पाहून त्यांच्या गावांना विकास निधी मिळवून दिला. तर काहींना पदे दिली. ही बाब भाजपाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागली. यातूनच आ.राजळे यांना या निवडणुकीत भाजपाने विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी काही निवडक अपवादांनी थेट ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी केली आहे. या नाराजातून भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे व स्व.माजी आमदार दगडु बडे पा. यांचा मुलगा सरपंच धनंजय बडे पा. यांनी या विधानसभेची निवडणूक लढण्याचा मानस केवळ त्यांच्या कार्यकर्त्याच्या आग्रह खातर धरला आहे. आता ही भाजपातील बंडखोरी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी कशी हताळतात ते वेळीच पाहण्यास मिळाले. तसेच शेवगाव परिसरात चांगलाच दबदबा असणाऱ्या लाडजळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या हर्षदाताई काकडे यांनी या विधानसभा निवडणुकीत उतारण्याची पूर्वी तयारी चांगलीच केली आहे. यामुळे ही परिस्थिती पाहात आमदार मोनिकाताई राजळे यांना ही निवडणूक वाटती एवढी सोपी नाही. त्यामुळे त्या ही बंडखोरी थापविण्यात यशस्वी होतात का हे पाहण्यास मिळेल. हा घटनाक्रम तसा तेवढा अँड प्रतापकाका ढाकणे यांनाही त्रासदायक आहे. आ.राजळे या अमोल गर्जे, सरपंच धनंजय बडे व हर्षदाताई काकडे यांना कशा थापवतात की, लढू देतात यावरही राजळे-ढाकणे यांच्या राजकीय गणिते वेळेवर पाहण्यास मिळतील. तत्पूर्वी प्रत्येकाने आपापल्या पर्यायाने मतदारसंघात जनसंपर्क सुरू केला आहे. यात सरपंच धनंजय बडे यांनाच भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून नगर जिल्ह्यातील एका मोठ्या पुढाऱ्याने पुढकार घेऊन ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी केली असल्याची चर्चा तालुक्यात जोरात सुरु झाली आहे. शेवटी भाजपाचे तिकीट कुणाला मिळते, यावर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे राजकारण फिरणार आहे. या घटनाक्रमामुळे दररोज तालुक्यातील राजकारणाचे वारे बदलत आहे. 

Post a Comment

0 Comments