Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुंड प्रवृत्तीच्या रेशनिंग दुकानदाराचा परवाना रद्द होण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषणचिखलात तंबू ठोकून तर हातात मच्छर अगरबत्ती घेऊन भर पावसात उपोषण
प्रशासनाने नेमुन दिलेल्या गैरसोयीच्या जागेचा आंदोलकांना फटका

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - रेशनिंगचे धान्य नागरिकांना वाटप न करता मारहाण करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या रेशनिंग दुकानदाराचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी दराडे कुटुंबीयांसह लाभार्थी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले. या परिसरात असलेल्या गैरसोयीची परवा न करता उपोषण कर्त्यांनी न्याय मिळण्यासाठी चिखलात तंबू ठोकून भर पावसात उपोषण केले. तर डासापासून संरक्षण मिळण्यासाठी उद्बत्ती हातात घेऊन उपोषणकर्ते बसले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बंदी करण्यात आल्याने उपोषणकर्त्यांना या अडगळीच्या ठिकाणी अनेक समस्या व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
जामखेड तालुक्यातील मौजे पांढरेवाडी येथे हरीदास जायभाय भगवान बाबा महिला बचत गटाच्या माध्यातून रेशनिंगचे दुकान चालवितो. सदर रेशनिंग दुकानदार रेशनिंगचा माल देत नसल्याने हिराबाई संभाजी दराडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सह्या घेऊन तहसिलदार व तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यावर रेशनिंग दुकानाची संबंधित अधिकार्‍यांनी चौकशी व तपासणी करुन दुसर्‍याकडे त्याचा परवाना दिला होता. याचा राग मनात धरुन हरीदास जायभाय व त्याच्या नातेवाईकांनी दराडे यांच्या घरावर हल्ला करुन हिराबाई दराडे यांना जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या कंबरेचे मणके मोडून त्यांना कायमचे अपंगत्व आले. या प्रकरणी संबंधीतांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र राजकीय दबावापोटी पुन्हा संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला रेशनिंग दुकानदारीचा परवाना देण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तातडीने सदरच्या गुंड प्रवृत्तीच्या रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द करावा, हिराबाई यांना आलेल्या कायमच्या अपंगत्वामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, स्थानिक ग्रामस्थांची तक्रार असताना कोणत्या आधारावर गुंड प्रवृत्तीच्या दुकानदारास रेशनिंगचा परवाना देण्यात आल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपोषणात संभाजी दराडे, हिराबाई दराडे, सुभाष दराडे, सुशिला खाडे, नवनाथ खाडे, बाळासाहेब सानप, जालिंदर वनवे, पांडूरंग दराडे, माजी पंचायत समितीच्या उप सभापती सुशिला खाडे, बेबी खाडे आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments