Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा.माणिकराव विधाते यांची पुन्हा नियुक्ती   
नगर रिपोर्टर
अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा.माणिकराव विधाते यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी (दि.9) दुपारी याबाबत पुन्हा निवड  केली आहे.
महापालिकेच्या महापौर निवडीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपाला मदत करत भाजपाचा महापौर केला होता. त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी 18 नगरसेवकांवर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच या घडामोडींची माहिती पक्षाच्या वरिष्ठ कार्यालयास न दिल्याचा ठपका ठेवत प्रा.माणिकराव विधाते यांंचे पद काढण्यात आले होते.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पक्षाने 18 नगरसेवकांचे निलंबन मागे घेतले होते. मात्र शहर जिल्हाध्यक्षपद अद्यापही रिक्तच ठेवण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या रिक्त पदावर पुन्हा प्रा.माणिकराव विधाते यांची नियुक्ती करुन तसे पत्र प्रा.विधाते यांना पाठविले आहे.

Post a Comment

0 Comments