Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग देणार्‍या पोलिस अधिकार्‍याचे उच्च न्यायालयानाकडून अभिनंदन
नगर रिर्पाटर 
इंदूर (मध्यप्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा ज्या मार्गावरुन जाण्याचे नियोजन होते. याच मार्गावरील एका चौकामध्ये अ‍ॅम्ब्यूलन्सला वाट करुन देणारे पोलिस अधिकारी मनोज रत्नाकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंदूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्वतः पुष्पगुच्छ घेऊन सीएसपी कार्यालयात गेले. त्यांनी सीएसपी मनोज रत्नाकर यांना पुष्पगुच्छ देऊन वेलडन म्हणत, त्यांनी दाखवलेली समयसूचकतेचे कौतूक केले. दुसरीकडे, ज्या महिला रुग्णांसाठी पोलिस अधिकार्‍याने हे काम केले होते, त्यांची प्रकृती आता चांगली आहे. त्यांनी देखील पोलिस अधिकार्‍याला धन्यवाद दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी स्वच्छता अवॉर्ड कार्यक्रमासाठी इंदूरला आले होते. तेव्हा त्यांचा ताफा येण्यापूर्वी एक अ‍ॅम्ब्यूलन्स चौकात येऊन थांबली. अ‍ॅम्ब्यूलन्समध्ये असलेल्या महिला रुग्ण निशी वैद्य यांची प्रकृती गंभीर झाली होती. तेव्हा पंतप्रधानांचा ताफा विमानतळावरुन रवाना झाला होता, परंतु चौकामध्ये येण्यासाठी अजून बराच वेळ होता. पोलिस अधिकार्‍याने पाहिले की महिलेच्या तोंडातून रक्त येत आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे लागलीच त्यांच्या लक्षात आले. ते म्हणाले, काही सेकंदात मला निर्णय घ्यायचा होता. कारण तेव्हा मी व्हीव्हीआयपी सुरक्षेत तैनात होता. तातडीने सर्व गोष्टींचा विचार केला आणि अ‍ॅम्ब्ाुलन्सला जाण्यासाठी मार्ग करुन दिला.  इंदूर उच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणाले, पोलिस अधिकार्‍याच्या संवेदनशिलतेने मी प्रभावित झालो. त्यामुळेच त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

0 Comments