Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर रिपोर्टर क्राईम न्यूज

नगर रिपोर्टर क्राईम न्यूज

नगर एलसीबी -
फरार आरोपी एलसीबी कडून अटक
नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतून दरोड्यातील फरार आरोपी सोमनाथ उर्फ सोम्या करशा भोसले ( वय २८ रा.सारोळा कसार ता.नगर) याला एलसीबी पथकाने पाठलाग करून पकडले. भोसले हा दोरड्यातील तीन गुन्ह्यात फरार होता. पो.नि.दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. बबन मखरे, संदीप पवार, शिवाजी ढाकणे, रविंद्र कर्डिले, विजय ठोंबरे आदींच्या पथकाने अकाळनेर- सारोळा रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ आरोपी भोसले याला पकडले.
--------
भिंगार कँम्प पोलिस ठाणे

जिल्ह्यातून शुभम धुमाळ तडीपार नगर शहरातील सारसनगर येथील शुभम उर्फ मडक्या मारुती धुमाळ (वय १९) यांच्या विरुध्द भिंगार कँम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रविण पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावरुन विभागीय दंडाधिकारी यांनी गुन्हेगार शुभम धुमाळ याच्या हद्दपार प्रस्ताव क्रमांक १८ प्रमाणे नगर जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार केले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधु, अपर पोलिस प्रमुख सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.प्रविण पाटील व पो उप नि भैय्यासाहेब देशमुख, स.फौ.राजेंद्र गायकवाड, राजेंद्र मुळे, रमेश वराट, राजु सुद्रीक, संतोष आडसूळ, राहुल द्वारके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments