केदारेश्वर चालू हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर देऊन मंजूर झालेला इथेलॉन व डिस्लरी प्रकल्प लवकरच सुरु करणार
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात शुक्रवारी दुपारी कारखानास्थळावर संपन्न झाली. प्रारंभी अहवाल सालात मृत्यू मुखी पडलेल्या कारखान्याचे सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच माजी केंद्रीय मंत्री मनोहर परिकर, सुषमा स्वराज, अरुण जेटली आदींना श्रद्धांजली अर्पण केली तर प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी अहवाल वाचन केले यावेळी बोलताना अध्यक्ष प्रतापराव ढाकणे म्हणाले गत हंगाम अत्यंत खडतर मार्गातून सर्वांच्या सहकार्यतून पार पडला दुष्काळा मूळे व कार्यक्षेत्रात अपुरा ऊस असल्याने अल्प गाळप झाले ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व ऊसतोडणी कामगार वाहतूकदारांचे पेमेंट अदा केले आहे बँकेचे कर्ज न घेता हंगाम सर्वांच्या सहकार्यने पार पडला आहे चालू वर्षी जायकवाडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने ऊस लागवड होणार आहे पण केदारेश्वरच्या कार्यक्षेत्रात हक्काचा ३-४ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध करण्यासाठी कार्यक्षेत्रात हक्काचे पाणी मिळण्यासाठी भविष्यात सामूहिक पणे लढा हाती घ्यावा लागणार आहे तसेच शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळण्यासाठी साखरेबरोबर इथेलॉन व डिस्टलरी प्रकल्पास मंजुरी मिळाली असून दोन्ही प्रकल्पाचे चालू हंगामात हाती घेऊन तातडीने कार्यन्वित करण्यासाठी संचालक मंडळाच्या प्रयत्न आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मोठी मदत होणार आहे आज भरीव रोजगार नाही सततच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला जातो त्यांना न्याय व दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे
यावेळी कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री बबनराव ढाकणे म्हणाले सत्ता कोणाचीही असो न्याय मिळण्यासाठी संघर्ष केला तरच सरकारला वाकावे लागते आज प्रश्न प्राध्याण्याने मार्गी लागण्यासाठी संघर्ष करण्याची कोणाची तयारी नाही काळ बदलला गेला आहे तसे राजकारण रेडिमेड झालं आहे आजच्या युवकांची संघर्षाची तयारी दिसत नाही त्यांना मूलभूत विविध प्रश्न व हक्काचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षा शिवाय पर्याय नाही त्यासाठी युवकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे पूर्व भागाचे अपुरे स्वपन्न पूर्ण करण्यासाठी एकसंघ पाठपुरावा करावा लागणार आहे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी अडचणीत चांगले काम केल्याबद्दल धन्यवाद दिले तर परिस्थीती नुसार काळाप्रमाणे बदल करावा लागणार आहे त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे माजीमंत्री बबनराव ढाकणे म्हणाले
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, प्रमोद विखे, बाळासाहेब सिरसाट, बाप्पासाहेब लांडे यांची मार्गदर्शपर भाषणे झाली
यावेळी उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, जिप सदस्या प्रभावती ढाकणे, संचालक सुरेश होळकर, बापूसाहेब घोडके, त्रिंबक चेमटे, बाळासाहेब फुंदे, विठ्ठल अभंग, श्रीमंत गव्हाणे, सतिश गव्हाणे, रणजित घुगे, शेषराव बटुळे, ज्ञानदेव घोरतळे, एकनाथ धावणे, बाप्पासाहेब काजळे, रायचंद अंधारे, अशोक तानवडे, बाळासाहेब घोरतळे, गहिनीनाथ ढाकणे, नारायण सिरसाट, सर्जेराव दहिफळे, शहाजी जाधव बोधेगाव चे माजी सरपंच अभय चव्हाण, सोमनाथ चव्हाण, अकाउंट विभागाचे तीर्थराज घुंगरट, प्रास्ताविक शरद सोनवणे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट यांनी मानले यावेळी सभासद कामगार ऊस उत्पादक शेतकरी विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------------------
केदारेश्वर वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, व्यासपीठावर माजीमंत्री बबनराव ढाकणे उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, सुरेश होळकर सह संचालक मंडळ व उपस्थित सभासद जनसमुदाय दिसत आहेत छाया बाळासाहेब खेडकर
0 Comments