Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवा - वृंदाताई कोल्हाळकर
आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
सावळीविहीर - शिक्षक ,विद्यार्थी आणि पालक  यांचा विचार जर सकारात्मक असेल तर विद्यार्थी चांगला घडू शकतो या करिता गुरूंच्या शब्दावर विश्वास  ठेवा असे  प्रतिपादन  वृंदाताई कोल्हाळकर यांनी केले.
 राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे  सौमय्या विद्या मंदिर शाळा लक्ष्मीवाडी येथे जाणीव सांस्कृतिक अभियानाच्या माध्यमातून विचारवेल व्याख्यान मालेच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सावळीविहिरचे माजी सरपंच बाळासाहेब जपे पा, मोहनराव मोरे, किशोर भांगे, जगन्नाथ पाटील, पत्रकार राजेंद्र दुनबळे, विद्यालयाचे मुख्यध्यापक धायतडक , पर्यवेक्षिका क्षिरसागर
, गणेश आगलावे आदी  मान्यवर  उपस्थित होते.
श्रीमती कोल्हाळकर पुढे म्हणल्या की,  विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखले पाहिजे. मी कोण आहे, मलापुढे काय बनायचे आहे. याचा अभ्यास करून जिंकण्याची दुरदृष्टी ठेवली पाहिजे. ध्येय आणि चिकाटीने  यश मिळवता येते. फक्त मनाचा
निर्धार केला पाहिजे. संवाद हा खूप महत्त्वाचा असून तो योग्य वेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी या मध्ये होणे गरजेचे आहे. आजारपण घालविण्यासाठी  व मन शांत ठेवण्या साठी योगा, प्राणायाम, व्यायाम महत्वाचा आहे. हल्ली मोबाईल मुळे घरातील संवाद संपत चालला आहे. योगाचे काही प्रात्याक्षिके यावेळी विध्यार्थीकडून करून घेतले. सदर कार्यक्रमास रवींद्र चौधरी, किशोर निघूते, नंदू सांगुळे, सिकंदर शेख, देविदास पाचपाटील,बिरजू परदेशी सह शिक्षक,कर्मचारी वृंद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी जाणीव सांस्कृतिक अभियानाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments