Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निवडणूक ही कुठल्याही जातीपातीची नाही अथवा धर्माची नाही. ही नगरच्या विकासाची : आ.संग्राम जगतापआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडीओ
अहमदनगर - निवडणूक ही कुठल्याही जातीपातीची नाही अथवा धर्माची नाही. ही नगरच्या विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे २१ दिवस द्या, हा संग्राम तुम्हाला १ हजार ८२५ दिवस उपलब्ध असेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शिल्प गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित स्नेह मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अरुण जगताप, नगरसेवक गणेश भोसले, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, संपत बारस्कर, सुनील कोतकर आदीसह मान्यवर उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले की, निवडणूक घेण्यासाठी अथवा विधानसभेत जाण्यासाठी नसून उद्याच्या नगरचे व्हिजन घेऊन आपण पुढे चाललो आहोत. व्हिजन असणे आता गरजेचे आहे. विकास ही प्रक्रिया नसून ती करावीच लागते. काहींनी स्वतःच्या राजकारणासाठी नगरचे नाव बदनाम केले आहे. यापुढील काळात नगर च्या एमआयडीसीत नवनवीन उद्योग आणून १ हजार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, असे जगताप यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक गणेश भोसले, निखिल वारे, उबेद शेख, सुमित कोठारी, अविनाश घुले, ऋषिकेश कोतकर, पंकज वाकळे आदींची भाषणे झाली. मेळाव्यास नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाउलबुद्धे, पक्षाचे अन्य नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments