Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निवडणूक खर्च निरीक्षक दीक्षित यांनी घेतला आढावा
 निवडणूक खर्च विषयक कामाचा आढावा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर ः भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व पथकांनी अचुक व कोटेकोरपणे कामकाज करुन दररोज विहित नमुन्यातील  अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक  नागेंद्र दीक्षित यांनी दिल्या.
 शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे आज सकाळी 11 वाजता 225-अहमदनगर (शहर) विधानसभा मतदार संघासाठी आयोगाकडून नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक  नागेंद्र दिक्षीत यांनी निवडणूक खर्च विषयक विविध विभाग व पथके यांच्या आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नगर उमेश पाटील,  सहाय्यक  निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती कुलट, निवडणूक खर्च विभाग, उत्पादन शुल्क, पोलिस मिडिया सेंटर माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती, आचारसंहित कक्ष इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. .
  या बैठकीमध्ये खर्च निरीक्षक श्री दीक्षित यांनी  भरारी पथके स्थिर सनियंत्रण पथके (एसएसटी) छायाचित्रण सनियंत्रण पथक (व्हीएसटी) छायाचित्रण निरीक्षण पथक (व्हीव्हीटी) इत्यादी पथकांनी आजपर्यत आचारसंहिता  अंमलबजावणी  व निवडणूक खर्च विषयक तक्रारीबाबत केलेल्या  कामकाजांचा आढावा घेतला व आजपर्यत पथकानी त्यांना नेमुण दिलेल्या चेकनाक्यावर केलेले कामकाज व त्याबाबतचे अहवाल याची तपासणी केली. पथकांनी संशयित  वाहनांची तपासणी करुन अवैध रित्या वाहतूक होत असलेली रोकड, मद्य,मादक पदार्थ व तत्समबाबी जप्त करुन संबंधिताविरुध्द योग्य ती कार्यवाही करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री पाटील यांनी  मतदान संघातील आदश्र् आचारसंहिता  अंमलबजावणी व निवडणूक  खर्च  विषयक कामकाज याबाबत सविस्तर माहिती दिली व सर्व विभागांनी  निवडणूक खर्च विषयक निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन त्याबाबतचाअहवाल निवडणूक निर्णय अधिकारी  व निवडणूक खर्च विभागास दैनदिन सादर करण्याबाबतच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मतदारांना निवडणूक खर्च विषयक / आचारसंहिता भंग विषयक काही तक्रार/आक्षेप असल्यास त्यांनी सिव्हीजील मोबाईल अ‍ॅपद्वारे  किंवा 0241- 2411600 या नियंत्रण कक्षाचे  दूरध्वनीवर तक्रार करावी व निवडणूक कर्मचारी आणि मतदार यांना काही समस्या असल्यास निरीक्षक नागेंद्र दीक्षित यांचे भ्रमणध्वनी क्रमांक 7385805532 यावर थेट संपर्क साधता येईल, असे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक नागेंद्र दीक्षित यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments