Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील ९ रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश - सानपआँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी - शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील ९ रस्त्यांचा पाठपुरावा केल्याने व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास गोल्हार यांच्या सहकार्याने शिफारस केली होती. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपसचिव यांच्या आदेशानुसार नाशिक अधिक्षक अभियंता यांनी पाहणी करून नमूद केलेले रस्ते २०१९-२० च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समावेश होण्यासाठी मंजुरी अहवाल पाठवला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी नगर रिपोर्टर शी बोलताना दिली.
शेवगाव परिसरातील खडका-मडका ते प्रभुवडगाव रस्ता (४.६ कि.मी), रानेगाव ते अघोडी रस्ता (३.३कि.मी), भावी निमगाव ते डोळेवस्ती कदमवस्ती ( ४.५कि.मी), हिगणगाव ते अडबगीनाच रस्ता ( २ कि.मी), सोनोशी ते रानेगाव रस्ता (५ कि.मी).
पाथर्डी परिसरातील मोहजदेवढे ते काळेवस्ती रस्ता ( ४.६ कि.मी), वडगाव - ढाकणवाडी ते चिंचपूर पांगुळ (५५ कि.मी), अंबिकानगर ते ठोंबरे वस्ती ( ५ कि.मी), चिंचपूर इजदे ते पांगारा फाटा (६ कि.मी) आदी रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पाठपुराव्या आती घेतले असल्याचे सानप यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments