Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ट्रक कार अपघातात भिंगारचे तिघे ठार

 


नगर-दौड महामार्गावरील घटना

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद जवळ ट्रक-कार भीषण अपघात चौघे ठार झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.अपघातामध्ये अनिरुद्ध भुजबळ (रा.एम ए काँलनी, वडारवाडी), असिफ पठाण (रा.नागरदेवळे), गोपीनाथ कु-हाडे (वडारवाडी) या तिघा भिंगारच्यासह वाळकी येथील शुभम खेडकर आदींचा ठार झालेल्या मध्ये  समावेश आहे.
नगर दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद येथील महादेव वस्तीजवळ ट्रक (एमपी 09 एच एच 8378) व कार (एम एच 04 BY 4857) या दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. अपघातात जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांचा चुलत भाचा तर महेश झोडगे यांचा सखा भाचा यासह भिंगारचे दोन व वाळकीचा एक जण असल्याचे समजते.श्रीगोंदयाहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. कार्ले यांच्यासह सरपंच दीपक साळवे, शरद चोभे, मिनीनाथ चोभे, राघू चोभे, मणेश भोसले व ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. 

Post a Comment

0 Comments